पीडितेच्या कुटुंबियांची अन्नधान्याची केली सोय ; घरदुरुस्तीसाठी देणार 1 हजार चिरे
सुभाष बोवलेकर यांचे दातृत्व
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला पोलीस ठाणे येथिल खेलगिरी मठ परिसरातील दाखल गुन्हयातील एका पिडीत कुटुंबियांनी पोलीस निरीक्षक वेंगुर्ला यांच्याकडे घरात कर्ता कमावणारा कोणी नसल्याने जेवण बनविण्यासाठी रेशन सामान मिळण्याबाबत विनंती केलेली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी पिडीत कुटुंबियांना मदत करण्याबाबत नागरीकांना आव्हान केलेले होते. त्यानुसार मठ सोसायटी चे चेअरमन सुभाष चंद्रकांत बोवलेकर यांनी आज पिडीत हिच्या कुटुंबियांना पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या सोबत जावून २० किलो तांदुळ, डाळ, चहापावडर, साखर, वाटाने, चने इत्यादी साहित्य देवून मदतीचा हात पुढे केलेला आहे. तसेच पिडीत कुटुंबियांच्या मोडकळीस आलेल्या घराची घरदुरुस्तीसाठी १००० चिरे देण्याचा पुढाकार घेतलेला आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या हाकेला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.











