विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही
रुपेश पावसकर यांचा प्रशासनाला इशारा
कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून ठीक ठिकाणी दरडी कोसळत आहेत तर चक्क रस्ते सुद्धा वाहून जायला लागले आहेत संबंधित विभाग मूग गिळून गप्प बसले असून याचे कोणाला देणं घेणं नाही असा आरोप ओबीसी सेल चे अध्यक्ष रुपेश पावसकर यांनी केला आहे.
चेंदवण वेलवाडी येथे डोंगर कोसळल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे हि मुले शाळेतून घरी येतात शाळेत जातात ती ४ ते ५ किलोमीटर पायी प्रवास करून चेंदवण हायस्कूल येथे जातात त्यांना अन्य मार्ग नसल्याने गैरसोय होत आहे या कडे प्रशासन लक्ष कधी देणार असा सवाल पावसकर यांनी उपस्थित केला आहे . हे सत्ताधारी सरकार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्रा पीठ खातय अशी अवस्था झाली आहे. तसेच प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही नुकसान होते ती मुले त्याच मार्गाने माउली मंदिर येथे शाळेत जातात या मुलांचे शिक्षण धोक्यात आले असून गटविकास अधिकारी या कडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता वेळीच पूर्ण करून द्यावा अशी मागणी रुपेश पावसकर यांनी केली आहे अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे पावसकर यांनी सांगितले आहे.











