शिक्षक समितीचा वर्धापन दिन मालवणमध्ये विविध उपक्रमांनी साजरा

रक्तदान शिबीर , वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम राबवून जपली सामाजिक बांधीलकी

चौके ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 22 जुलै 2023 रोजी 61 वा वर्धापन दिन मालवण शाखेने विविध उपक्रम घेऊन संपन्न करण्यात आला. दरम्यान काल शनिवारी सकाळी ठिक 9.30 वाजता वर्धापन दिनाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल कट्टा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हायस्कूल संस्था सचिव श्रीम. विजयश्री देसाई , मुख्याध्यापक मा. श्री. संजय नाईक , तालुकाध्यक्ष श्री. सुयोग धामापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबीरात एकूण 10 रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. यावेळी नूतन पतपेढी संचालक श्री. मंगेश कांबळी, संचालक श्री. चंद्रसेन पाताडे, जिल्हा महिला आघाडी सचिव श्रीम. वैभवी कसालकर , उन्नती कराळे , माजी तालुकाध्यक्ष परमानंद वेगुर्लेकर, सल्लागार श्रीकृष्ण सावंत , कार्याध्यक्ष रुपेश गरुड, विकास घाडीगावकर, विलास सरनाईक, संतोष नेरकर आदि समिती कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. धाकू झोरे यांनी केले.
उपक्रमाचे दुसरे सत्र केंद्रशाळा कट्टा नं.1 याठिकाणी संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कै. भा. वा. शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सदर कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये जिल्हांतर्गत बदलीने इतर तालुक्यामधून मालवण तालुक्यात हजर झालेल्या समिती सभासदांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कणकवली तालुक्यातून चिंदर पालकरवाडी येथील कार्यरत शिक्षक श्री. अमोल खेडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कट्टा नं.1 येथे माडाचे व पोफळीचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचालक म्हणून नावलौकिक मिळवलेले व प्राथमिक शिक्षक पतपेढीला उच्च शिखरावर नेणारे माजी पतपेढी संचालक श्री. राजेंद्रप्रसाद गाड यांचा वाढदिवस असल्याने केक कापून त्यांना समिती परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संचालक मंगेश कांबळी, तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर , माजी संचालक राजेंद्रप्रसाद गाड, कार्याध्यक्ष रुपेश गरुड, संतोष नेरकर, धाकू झोरे, दिपक गोसावी, रतन बुटे, अमोल खेडकर, मारुती चव्हाण आदि समिती कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. नवनाथ भोळे यांनी केले.

error: Content is protected !!