सिंधुदुर्गातून जाणारी वाहतूक राधानगरी मार्गे सुरू
वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली मधील महामार्गावर रात्रीपासून पाणी आल्याने सिंधुदुर्ग व कोल्हापूर मार्ग होणारी वाहतूक ठप्प झाली आहे . त्यामुळे अद्यापही सिंधुदुर्गातून जाणारी वाहतूक राधानगरी मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात आली आहे. पावसाने जोर असाच कायम राहिल्यास हा मार्ग पुढील काही दिवस बंदच राहणार असल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.












