कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. कणकवली नगरपंचायत च्या नवीन अग्निशामक बंबाचे उदघाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी नगराध्यक्ष दालनात आ. नितेश राणे यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अबिद नाईक यांचे अभिनंदन केले. राज्यात भाजपा शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस चे सरकार आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द यशस्वी होवो अशा शब्दांत आ.नितेश राणेंनी नाईक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगरध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर,अभि मुसळे, ऍड.विराज भोसले, बाबू गायकवाड, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, राजश्री धुमाळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, चारू साटम आदी उपस्थित होते.













