देवगड दुर्गम वाडीतील गरजूना रोटरी क्लब तर्फे व्हील चेअर चे वाटप

देवगड (प्रतिनिधी) : रोटरी क्लबचा माध्यमातून देवगड मधील दुर्गम वाडीत जाऊन गरजू ना तीन व्हील चेअर देण्यात आल्या .
याप्रसंगी पडेल ग्राम पंचायत चे सरपंच भूषण पोकळे तसेच रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रो.प्रविण पोकळे,सेक्रेटरी रो.विजय बांदिवडेकर,चार्टर प्रेसिडेंट रो.हनीफ मेमन , आय आर पी रो.श्रीपाद पारकर,रो.संजय धुरी,रो.नरेश डामरी,रो.दयानंद पाटील आणि पडेल गावचे ग्रामस्थ, चव्हाण कुटुंबिय उपस्थित होते .

यावेळी प्रे.प्रविण यांचा कुटुंबाच्या वतीने शाल ,श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रोटरी क्लबच्या माध्यमातून सत्यवती धाकला चव्हाण यांना व्हील चेअर प्रदान करण्यात आली. तसेच शकुंतला गोविंद गावकर, वय 64 यांना अतिशय दुर्गम भागात वास्तव्य असून त्यांनाही व्हील चेअर देण्यात आली यावेळी रोटरी प्रती भावना व्यक्त करताना कुटुंबीयांनी चार्टर प्रे.हनीफ मेमन यांना शाल,श्रीफळ दिले.

सरपंच भूषण पोकळे यांनी या कार्यक्रमाचा समारोप करताना रोटरी आणि रोटरी मेंबर विषयी गौरोदगार काढले.
यानंतर रो .मनस्वी घारे ,रो.महेश घारे यांनी सूचित केल्यावरून दहिबाब येथील मंदा गोविंद पोसंम हिला व्हीलचेअर प्रदान करण्यात आली .मंदा या आपल्या दोन भगिनी आणि आईसोबत राहतात. या घरात कुणीही पुरुष मंडळी नाहीत.स्वत त्या कर्क रोगाने ग्रस्त आहेत. शिवाय दृष्टी अधू झालिये.या निमित्ताने बोलतांना प्रे.पोकळे म्हणाले की हे सगळ करत असताना लाभार्थी च्या डोळ्यातील समाधान आम्हाला बरच काही देऊन जाते.

आज यानंतर शिरगाव मध्ये असणारी काही वानरमारी कुटुंब.आज त्यातली काहीं मुल शिक्षण घेताना दिसतात.डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांच्यामुळे एकांकिका,नाटकात काम करतात.त्यांच्या मुळेच या मुलांच्या विचारांची दिशाच बदलली.ज्या पालकांचा शिक्षणाचा कधी दुरान्वये ही संबंध आला नव्हता अशा पालकांची मुले बारावी पर्यंतचे शिक्षण घेताना दिसतात.
आमचे प्रेसिडेंट प्रविण पोकळे यांच्या चर्चेत असा विषय निघाला की आपणास दोन सौऊर्जेवर चालणारे दोन दीप अशा मुलांना द्यायचे आहेत की ज्यांच्याजवळ वीज नाही. आजकालच्या जगात असे घर सापडण तसे कठीणच .लागलीच माझ्या डोक्यात विचार आला या रानोमाळ भटकणाऱ्या वानरमारी कुटुंबा मध्ये लाईट नसेल.

मग शिरगांव मधील माझे मित्र विशाल साटम यांच्याशी संपर्क साधला.त्यांना ही गोष्ट सांगितल्यावर ते कमालीचे खूष झाले.त्यांनी यादीच सांगितली अशी आठ दहा कुटुंब तरी असतील ज्यांच्याकडे लाईटच नाही.आणि बारा मुले शिक्षण घेत आहेत. खरच तुम्ही असे काही तरी दया त्यांना.ती मुले पावरबँक वैगेरे वापरतात ,माझ्या दुकानात चार्जिंग करतात आणि आपला अभ्यास करतात. आज आम्ही आमचे रोटरियन मित्र अशोक मजूमले यांच्या माध्यमातून हे दोन दिवे देत आहोत. तोपर्यंत रोटरी च्या माध्यमातून या सर्व मुला मुलींना वह्या ,पेन वस्तू देणार आहोत.

आपण कितीही दिलं तरी हे कमीच आहे.जाता जाता या मुलांच्या बाबतीत अनिल अवचट यांच्या भटकंती या पुस्तकातील अर्पण पत्रिका आठवली.समाजाने ज्यांना भटकंती बहाल केली,त्या सर्व उपऱ्याना अपराधी भावनेने अर्पण

error: Content is protected !!