श्री संप्रदायाबद्दल अनुद्गार काढणाऱ्या आ.वैभव नाईकांना फळे भोगावी लागतील

भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचा पलटवार

कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक उपजुनी करंट नेने अद्वैत वाटा प्रमाणे नको त्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. आमदार वैभव नाईक यांनी श्री सदस्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्याच अंगलट आलेले आहेत.श्री संप्रदायाच्या विरोधात गेल्याचे फळ आमदार वैभव नाईक यांना भोगावे लागतील. असा पलटवार भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी केला. यावेळी उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत , संतोष चव्हाण उपस्थित होते.संत तुकाराम यांच्या जातो न येतीया वाटा ..काय निरवतो करंटा.. कैसा जालासे बेशरम..लाज नाही न म्हणे राम यांच्या ओवीचा दाखला देत संतोष कानडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर खरपूस टीका केली. धर्माधिकारी यांच्या श्री संप्रदायाबद्दल वैभव नाईक यांनी काढलेले उदगार चुकीचे आहेत. नानासाहेब धर्माधिकारी आणि श्री सदस्यांबद्दल आमदार नितेश राणे संभ्रमावस्था निर्माण करत असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. 6 महिन्यांमागिल अधिवेशनात काँग्रेस काढलेल्या मुद्दाला तात्काळ वैभव नाईक अथवा उबाठा सेनेच्या आमदारांनी हरकत का घेतली नाही ? त्यांच्या मुद्द्याला खतपाणी घालण्याचे कामच उबाठा सेनेने केले. आणि आता 6 महिन्यांनी मागील मुद्दा उकरून पुन्हा श्री सदस्यांच्या भावना आमदार वैभव नाईक दुखावत आहेत. याची फळे त्यांना भोगावी लागतील अशी टीकाही कानडे यांनी केली.

error: Content is protected !!