सुनंदा भिकाजी फोंडेकर यांचे निधन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सावंतवाडी डीवायएसपी कार्यालयातील पोलीस हवालदार अजय विजय फोंडेकर यांच्या आजी सुनंदा भिकाजी फोंडेकर वय 90 रा. फोंडेकरवाडी, (फोंडाघाट) यांचे आज 30 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता फोंडाघाट येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चत सून, विवाहित मुली, जावई, नातवंडे, नातसून, पणतवंडे असा परिवार आहे.त्यांच्या मृतदेहावर आज सायंकाळी फोंडाघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.