मोटर वाहन अपघात प्रकरणी मृताच्या वरसास साडे सदतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई

ऍड दीपक अंधारी यांनी मिळवून दिली नुकसानभरपाई

कणकवली (प्रतिनिधी): मयत विशाल शिरोडकर हा आपल्या पत्नीसह वेंगुर्ला येथून शिरोडा येथे जात असताना, मोचेमांड येथे लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने विशाल याचा दुर्दैवीरित्या अंत झाला होता.प्रस्तुत अपघात प्रकरणी लक्झरी बस चालक कृष्णा भालके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल याचे अपघातापूर्वी चार महिने अगोदरच लग्न झाले होते. कै विशाल हा विलास शिरोडकर यांचा एकुलता एक मुलगा होता. विशाल याच्या अपघाती निधनाने शिरोडकर कुटुंबीयांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता.कै.विशाल याच्या पश्चात त्याचे आई-वडील, पत्नी व बहीण असे वारस आहेत. कै.विशाल च्या वारसांनी ओरस येथील मोटर अपघात वाद न्यायाधीकरणात अँड. दीपक अंधारी, यांचे मार्फत अपघाती नुकसान भरपाई साठी दावा अर्ज दाखल केला होता. दावा अर्जाचे प्रकरणी अपघातग्रस्त बसचे चालक,मालक व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांना पक्षकार करण्यात आले होते. दावा अर्जासंदर्भातील सर्व पुराव्यांचा विचार करून,मोटर अपघात वाद न्यायाधीकरणाने केलेल्या आदेशाने,अर्जदार शिरोडकर कुटुंबीयांना विमा कंपनीकडून 37 लाख 65 हजार एवढी व्याजासह नुकसान भरपाई वसूल करता येणार आहे. मोटर अपघात वाद न्यायाधिकरण सिंधुदुर्गचे माननीय न्यायाधीश व्ही.एस देशमुख साहेब यांनी निर्णय देताना अपघात प्रकरणी बस चालकाची पूर्णपणे चूक मानून बसच्या विमा कंपनीकडून व्याजासह नुकसान भरपाई वसूल करावी असे आदेश दिले आहेत. अर्जदारचे वतीने अँड.दीपक अंधारी यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!