बिडिओ व गट शिक्षण अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेरावा प्रशासनाची तात्काळ कार्यवाही- ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.शाळा रामेश्वर नगर,खारेपाटण या शाळेत रिक्त असलेल्या शिक्षक पदाबाबत ग्रामस्थानी रामेश्वर नगर शाळा सुधार समितीचे अध्यक्ष श्री मंगेश गुरव यांच्या वतीने शिक्षक न मिळाल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत भाजप पक्षाचे पदाधिकारी माजी जि.प. सदस्य श्री रवींद्र जठार माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटण येथील ग्रामस्थांनी थेट कणकवली पं.स.गट शिक्षणाधिकारी श्री किशोर गवस यांनी भेट घेतली.व रामेश्वर नगर खारेपाटण जि.प.शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळण्याची मागणी केली .यावर तत्काळ कार्यवाही करत शिक्षण विभागाकडून खारेपाटण रामेश्वर नगर शाळेला पूर्वीचीच शिक्षिका देत असल्याचे लेखी पत्र दिल्यामुळे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले.
खारेपाटण रामेश्वर नगर जि.प. शाळेत एकूण ४२ विद्यार्थी असून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे एकूण ४ वर्ग असून सद्य स्थितीत शिक्षक मात्र एकच आहे. ही परस्थिती शासनाच्या लक्षात येताच चिंचवली जि.प.शाळा येथील शिक्षिका श्रीम.शारदा तांदळे यांना कामगिरीवर रामेश्वर नगर जि.प.शाळेत ऑर्डर देण्यात आली होती. मात्र काही दिवसातच पुन्हा एकदा त्यांची कामगिरी दुसऱ्या शाळेवर काढण्यात आली. त्यामुळे रामेश्वर नगर शाळा पुन्हा एकदा एक शिक्षकी झाली होती. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थानी तातडीची बैठक घेऊन शिक्षक मिळण्यासाठी कणकवली पं.स.येथे जाऊन गट शिक्षण अधिकारयांची भेट घेऊन शाळा बंदचा इशारा दिला होता.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सौ तृप्ती माळवदे,खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,खारेपाटण ग्रा.प.सदस्य सौ मनाली होनाळे,सौ शितिजा धुमाळे,दक्षता सुतार, चिंचवली सरपंच अशोक पाटील, वायगणी उपसरपंच श्री फाटक वांरगाव उपसरपंच नाना शेट्ये आदी मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान भाजप पक्षाच्या वतीने खारेपाटण विभागातील एक क्षिक्षकी व शून्य शिक्षकी असलेल्या शाळेचा प्रश्न गट शिक्षण अधिकारी कणकवली यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा काढून निकाली काढण्यात आले असल्याचे यावेळी माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी सांगितले.दरम्यान रामेश्वर नगर,खारेपाटण जि.प. शाळेला श्रीम.तांदळे मॅडम,टाकेवाडी संभाजी नगर गुरववाडी जि.प. शाळेला श्रीम झगडे मॅडम तर हसोळ टेंब कोंडवाडी जि.प.शाळेला श्रीम.सावंत मॅडम व चिंचवली मधली वाडी जि.प. सेवा निवृत्त शिक्षक श्री कांबळे आदी शिक्षक देण्यात आले असल्याचे यावेळी प्रशासनाकडून व भाजप पदाधिकर्यांच्या वतीने सांगण्यात आले.