कनेडी ते नाटळ दरम्यान रस्त्याचे काम निकृष्ट

रस्ता दुरुस्ती न केल्यास 17 ऑगस्ट रोजी छेडणार आंदोलन

शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नरडवे राज्य मार्गावरील कनेडी ते नाटळ दुबळेश्वरवाडी पर्यंतचा दोन महिन्यांपूर्वी मे महिन्यात केलेला रस्ता खराब झाला असून त्याची खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे वाहन अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करावी.तसेच तात्काळ या रस्त्याची डागडुजी करावी. अन्यथा 17 ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामस्थांसोबत शिवसेना उबाठा पक्ष्याच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता दिवटे याना निवेदनातून दिला आहे. यावेळी नाटळ विभागप्रमुख आनंद आचरेकर, प्रदीप सावंत, जितेंद्र सावंत, लक्ष्मीकांत लाड, रीमेश चव्हाण, महेश कोदे, सिद्धेश राणे, कमलेश नारकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!