खारेपाटण (प्रतिनिधी) : दरवर्षी आर. टी. एस. इ. ही परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी उज्वल यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षी घेण्यात आलेल्या आर. टी. एस. इ.परीक्षेत या विद्यार्थ्यानी आपली गुणवत्ता सिद्ध करताना आपल्या शाळेची मान ऊंचावली आहे.
यामध्ये सहावीतील विद्यार्थी रेवन अनंत राऊळ हा राज्यामध्ये तिसरा आलेला आहे. दूसरीतील विद्यार्थिनी कुमारी – सुखदा संतोष राऊत हिने १४८ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तीसरीतील विद्यार्थिनी कु. स्वरा मिलिंद डोळ हिने १५६ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, पाचवीतील विद्यार्थी रितेश गोरक्षनाथ गायकवाड १०२ हा जिल्ह्यात द्वितीय सहावीतील अनुराग सचिन महिंद्रे १३० गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, ताजीन मुश्ताक पटेल १२२गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय, सातवीतील कु.संस्कृती संजय भोर १२६ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, आठवीतील आयुष प्रशांत आलते ७८ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय, नववीतील कु.इकरा नजीर मुकादम १०४ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या सर्व विद्यार्थ्याना जिल्हा स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे.तर या सर्व विद्यार्थ्याना त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे व त्यांच्या पालकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.या उज्वल यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसूलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय सानप, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.













