आचरा (प्रतिनिधी) : देवगड तालुका तलाठी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व्ही व्ही तानवडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी डी बी चव्हाण मंडल अधिकारी तळवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी एस डी सरवदे, सचिव पदी सौ एस के खरात, सहसचिव आर व्ही डगरे तर खजिनदार पदी एस बी साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. तहसीलदार कार्यालय देवगड येथे घेण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. संघटनेच्या सल्लागार पदी आर एल निग्रे, व्ही व्ही तानवडे, एस एस राठोड, डी एम पावसकर, सौ सुनिता मेस्त्री यांची निवड करण्यात आली. नुतन कार्यकारिणीचे देवगड तालुका तलाठी मंडल अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
देवगड तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्ष पदी डी बी चव्हाण..!












