प्लास्टरचे काम करताना पडल्याने पाय झालाय फ्रॅक्चर

आडेली- आंबेडकरनगर येथील दशावतारी कलाकार सोनूला हवाय आर्थिक मदतीचा हात

दोडामार्ग (प्रतिनिधी) : आडेली- आंबेडकरनगर येथील रहिवासी व सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ पिकुळे,. ता. दोडामार्ग या कंपनीमध्ये खलनायक म्हणून काम करणारे दशावतारी कलाकार सोनू उर्फ अमित विष्णू आडेलकर (३८) अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्ती, सामाजिक असे आवाहन करण्यात आले आहे. २४ जुलै २०२३ रोजी प्लास्टरचे काम करताना अमित आडेलकर हे पडून त्यांच्या पायाच्या टाचेचे हाड मोडले. सदरचे काम घेतलेल्या मालकाने प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडले. पण, पाय फॅक्चर असल्याने अमित यांना खूप त्रास जाणवू लागला. सामाजिक कार्यकर्ते उदय आडेलकर यांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी अमितला उपचारासाठी कुडाळ येथील डॉ. नवांगुळ यांच्या दवाखान्यामध्ये दाखल करुन एक्स-रे काढला असता डॉक्टरांनी पायाचे हाड प्रॅक्चर असून तातडीचे ऑपरेशन करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अमित यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले. अमित यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ते मोलमुजरी करून आपल्या कुटुंबाच उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तीन- चार महिने काम करता संस्थांनी सहकार्य करावे, सोनू आडेलकर येणार नाही. पुढील उपचारासाठी त्यांना आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. याबाबत सामाजिक प्रतिनिधींनी पुढे यावे व अमित आडेलकर यांना आर्थिक सहकार्य करावे. कॅनरा बँक, सोनू विष्णू आडेलकर, अकाऊंट नंबर ११०९२९०४३०९९, आयएफएससी कोड सीएनआरबी ००१७२२७. मदत करण्यास इच्छुक व्यक्तींनी उदय आडेलकर ७७०९९९३६३९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!