माझी माती माझा देश अंतर्गत कणकवली पोलीस ठाण्यात पंचप्रण शपथ उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : माझी माती, माझा देश या उपक्रमांतर्गत ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत कणकवली पोलीस ठाणे निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंचप्राण शपथ घेतलेली आहे. भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु, देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु,भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु अशी पंचप्राण शपथ कणकवली पोलीस ठाण्यात पोलिसांनी घेतली.

error: Content is protected !!