जोडरस्ता व स्मशानभूमीसाठी भूखंडाची प्रलंबित मागणी
कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ एमआयडीसी प्रकल्प ग्रस्त शेतकरी आपल्या प्रमुख मागण्यांपैकी गेली दोन वर्षे वारंवार पाठपुरावा करुनही पूर्ण होत नसलेल्या जोडरस्ता व स्मशानभूमीसाठी भूखंड मिळावा या मागणीसाठी नेरुर गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी श्याम बाळकृष्ण गावडे हे इतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे लेखी निवेदन श्याम गावडे यांनी आज एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्या सोबत प्रभाकर गावडे, हेमंत जाधव अजित मार्गी हे उपस्थित होते .












