कारखान्यातील कामगाराच्या मृत्युस कारणीभुत ठरलेच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

ओरोस (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील आकाश फीश मील येथील कामगाराचा कारखान्यात काम करत असताना अपघाती मृत्यु झाल्याच्या आरोपातून कारखान्याचे संचालक शाम सारंग यांची सिंधुदुर्गनग्री येथील अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डी चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. सारंग यांचेवतीने अॅड. यतिश खानोलकर यांनी कामकाज पाहीले. त्यांना अॅड. रोहीत उर्फ तानाजी पालव व अॅड कोमल काकतकर यांनी सहायय केले.

हा अपघात 22 मे 2017 रोजी खवणे येथील आकाश फीश मील येथे घडलेला होता. या कारखान्यातील कामगार मयत सरत डोरा हा मीलमधील कुलर मशीनवर काम करीत होता. काम चालु असताना मशिनमध्ये आवाज येत असल्याने त्याची पाहणी करणेस तो गेला असता त्याचा त्या मशिनमध्ये पाय अडकुन अपघात झाला व त्यातच तो मयत झाला होता. या प्रकरणी कारखाना निरीक्षक कोल्हापुर यांनी अपघात स्थळाला भेट देऊन व तपासकाम करुन अपघातप्रकरणी आकाश फीश मीलचे संचालक शाम सारंग यांचे विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. अपघातास कारणीभूत ठरलेचे आरोप ठेवुन फॅक्टरी अॅक्टचे कलम 7 अ 2 अ आणि 92 नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या खटल्याची अतिरिक्त मुख्य न्यायंदडाधिकारी एस डी चव्हाण यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी आरोपी यांचेविरुदध कोणताही सबळ पुरावा आढळुन आला नाही. या अपघातात कामगाराची चुकी असल्याचे निर्दशनास आल्याचे तसेच आरोपीचे वकीलांनी सादर केलेला पुरावा व बचाव ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

error: Content is protected !!