‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत पीएम मोदींचं देशवासियांना आवाहन ! 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान…

(ब्युरो न्युज) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा सुरुवात केली. यावर्षी देखेली पंतप्रधानांनी करोडो भारतीयांना आवाहन केलं आहे. भारताचा तिरंगा राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असल्याचं पीएम मोदी यांनी म्हटलं आहे. पीएम मोदी यांनी एक ट्विट केलं असून ‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि याचा सेल्फी (Selfie) ‘हर घर तिरंगा’ वेबसाईटवर अपलोड करावा असं आवाहन केलं आहे. https://harghartiranga.com या वेबसाईटवर आपला सेल्फी अपलोड करावा,असं पीएम मोदी यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राजधानी दिल्लीत ‘हर घर तिरंगा’ बाईक रॅली काढण्यात आली. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सहभाग घेतला होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. प्रगती मैदान ते इंडिया गेट अशी ही रॅली काढण्यात आली. गेल्यावर्षी या वेबसाईटवर जवळपास सहा कोटी लोकांनी तिरंग्यासोबतचा सेल्फी अपलोड केला होता. या 15 तारखेला भारत स्वातंत्र्याची 76 वर्ष पूर्ण करणार आहे. हर घर तिरंगा अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाला एक नवी उर्जा देणारा आहे. देशवासियांना हे अभियान यावर्षी एका नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. यासाठी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशवासियांनी आन-बान आणि शान राखत राष्ट्रीय ध्वज आपल्या घरावर फडकावावा आणि याचा सेल्फी वेबसाईटवर अपलोड करावा असं आवाहन केलं आहे.

error: Content is protected !!