मेरी माटी मेरा देश अंतर्गत ७५ झाडे लावत राबवीले अभियान
चौके ( अमोल गोसावी ) : मेरी माटी मेरा देश या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत चौके येथील श्री देवी भराडी मंदिर परिसरात भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या तसेच स्थानिक शालेय समितीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची ७५ झाडे लावत देशाचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश हे अभियान राबविण्यात आले. यावेळी स्थानिक शालेय समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, उपाध्यक्ष अनिल सुकाळी, पालक संघाचे अध्यक्ष मोहन गावडे,चौके सरपंच गोपाळ चौकेकर, पचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावाडे, उद्योजक पापा मांडलकर, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव वरवडेकर, मुख्याध्यापिका रसिका गोसावी ,व्यापारी संघ अध्यक्ष नंदू राणे, शंकर गावडे, कृष्णा चौकेकर, तुषार गावडे, पराग गावडे, हनुमंत गावडे, लक्ष्मण गावडे, भाई माळके, राजन गावडे(साळेल) आदी ग्रामस्थ तसेच सुमारे २५० शालेय मुलांसह प्रशालेचे शिक्षक कर्मचारी यांचा सहभाग होता.