रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट ; 4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये
रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 वेळ : स. 8 ते स. 11.00 वा.
कणकवली (प्रतिनिध) : माधवबाग च्या वतीने हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस,मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी खास आरोग्य शिबीर रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 ते संध्या. 11 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात 4050 रु ची तपासणी फक्त 899 मध्ये केली जाणार आहे. शिबिरातील रक्त तपासणीत डायबेटिस (Diabetes Profile)HbA1C, कोलेस्ट्रॉल (Lipid Profile), किडनी(Kidney Function Test) लिव्हर (Liver Function Test), थायरॉईड (Thyroid Stimulating Hormone) ( TSH) आदी तपासण्या केल्या जाणार आहेत.
रुग्णांची स्ट्रेस टेस्ट तपासणी केली जाणार आहे. स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टँडर्ड इन्वेस्टिगेशन आहे. ज्यातून तुमच्या हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते. हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे लक्षात येते. हृदयाचा रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये कळते . यासाठी उपाशी पोटी सॅम्पल देणे आवश्यक असून आगाऊ नाव नोंदणीसाठी माधवबागच्या खालील शाखेशी संपर्क साधावा. कणकवली – 9373183888, कुडाळ – 9011328581, सावंतवाडी – 7774028185.












