प्रभारी सरपंच दिपक सुर्वै यांचे काम कौतुकास्पद – संजय गोसावी
चिंदर गावातील मान्यवरांचा सत्कार व वृक्ष दिंडी कार्यक्रम
आचरा (प्रतिनिधी) : अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा देशात सुरू असताना चिंदर ग्रामपंचायत व मालवण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर ग्रामपंचायत येथे सकाळी चिंदरचे माजी सरपंच व जेष्ठ नागरिक रामचंद्र खोत यांच्या हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला.
“मेरी मिट्टी, मेरा देश” अभियानांतर्गत मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी ‘आप्पासाहेब गुजर’ व मालवण कृषी अधिकारी संजय गोसावी यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात’ हातात पणती घेऊन पंचप्रण शपथही घेण्यात आली.
गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या 10 मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मालवण तालुका गटविकास अधिकारी आप्पा साहेब गुजर म्हणाले कि आपण सर्वांनी एकजूटीने काम करुया देशाच्या विकासासाठी आपल्या सर्वांचा हातभार गरजेचा आहे. कृषी अधिकारी संजय गोसावी म्हणाले की चिंदर प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यानंतर गावातील सर्व जिल्हा परीषद शाळा मधील विद्यार्थी, आकारी ब्राह्मण देव गावठणवाडी, भगवती उत्साही मंडळ यांच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली.यात विठ्ठल रखुमाईचा देखावा विशेष आकर्षण ठरला, गटविकास अधिकारी आप्पा साहेब गुजर,तालुका कृषी अधिकारी संजय गोसावी,ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी प्रभाकर जाधव,आरोग्य विभाग विस्तार अधिकारी सुजय बांगर तसेच सरपंच दिपक सुर्वै यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर,स्वरा पालकर,रिया घागरे,जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर,माजी सभापती हिमाली अमरे,ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर,सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर,नारायण पाताडे,आरोग्य सेवक संतोष गोसावी, विश्राम माळगांवकर,भाई तावडे,डाँ.विवेक घाडगे, सिध्देश नाटेकर,समिर अपराज,अरविंद घाडी,डाँ. मिलिंद कांबळी,दयाळ भाऊ अपराज,पंढरीनाथ कामतेकर,प्रिया पालकर,अमृता तोरसोळकर,रणजित दत्तदास, शिक्षक,पालक विद्यार्थी,आशा सेविका,आरोग्य सेविका,अंगणवाडी कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिमाशंकर शेतसंदी यांनी तर समारोप ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर यांनी केले.












