” मेरी मिट्टी मेरा देश ” अभियान अंतर्गत आंबेरी येथे माजी सैनिक अनंत परब यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण

चौके (अमोल गोसावी) : आजादी का अमृत महोत्सव निमित्त ” मेरी मिट्टी मेरा देश ” या अभियानाअंतर्गत मालवण तालुक्यातील आंबेरी गावात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सांगता सोहळा स्फूर्तीदायक उपक्रमांनी पार पडला. त्यानिमित्त आज आंबेरी ग्रामपंचायत परीसरात माजी सैनिक अनंत परब यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी ग्रामसेवक स्वाती कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर दीपप्रज्वलन व शिलाफलक अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी दिप प्रज्वलित करून शपथ घेण्यात आली. त्यानंतर आजी माजी सैनिक,पोलिस यांचा व यांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी / विद्यार्थिनी यांना वह्या वाटप करण्यात आले.तर पहिली ते सातवी पर्यंत मुलांना गोष्टी ची पुस्तक अशोक परब ( तावडेवाडी) यांच्या कडून देण्यात आली नंतर अंगणवाडीला प्रत्येक मुलासाठी ग्रामपंचायत च्या 15 वा वित्त आयोगातून छोटे डेस्क देण्यात आले. तसेच माजी सैनिक अनंत परब यांच्या हस्ते ग्रामपंचायत परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर,उपसरपंच रवींद्र परब,माजी पंचायत समिती सदस्या श्रद्धा केळुस्कर,पं.स.कृषी अधिकारी कांबळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि आंबेरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!