मेरी मिट्टी मेरा देश अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत लोरे नं १ येथे शिलालेखाच अनावरण

कणकवली (प्रतिनिधी) : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या सांगता सोहळ्यानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत लोरे नं 1 येथे शिलालेखाचे पूजन माजी सभापती मनोज रावराणे , लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनंतर स्वच्छ स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मार्फत ग्रामपंचायतिने स्वच्छ परिसर स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले लोरे नं १ गावचे रहिवासी अजित ढवण गांधीवाडी यांना ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला . प्रज्वलित दिवे हातामध्ये धरून सर्व उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेऊन दोन मूठ माती कलशामध्ये घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पोलीस दल ,आर्मी मधील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी सैनिक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.

त्यावेळी सरपंच अजय रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे, उपसरपंच सुमन गुरव, ग्रामसेवक -ऋतुराज कदम, ग्रा पं सदस्य नरेश गुरव, सतीश कासले, सुप्रिया रावराणे सोनाक्षी खाड्ये ,समीक्षा मोसमकर, सुनील रावराणे , ग्रामस्थ -अलंकार रावराणे ,मारुती राणे, अनंत राणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आरोग्य कर्मचारी ,आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!