आदिवासी समाजाने बोलीभाषा, रुढी परंपरा जोपासली पाहिजे – महेश गुरव..

आशिये ठाकरवाडी जागतिक आदिवासी दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आदिवासी बांधव आपल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात.आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी विविध योजना आहेत. आदिवासी समाजाने आपली जीवनशैली, रुढी, प्रथा, परंपरा कायम जोपासली पाहिजे.आ.नितेश राणे यांनी ठाकर समाजाच्या जात पडताळणी प्रश्न विधिमंडळात मांडून समाजाला न्याय दिला आहे.आशिये ग्रामपंचायत च्या माध्यमातून लागेल ती मदत केली जाईल, असे प्रतिपादन सरपंच महेश गुरव यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज,सिंधुदुर्ग यांच्यावतीने शाखा -कणकवली ठाकर समाज यांच्या मार्फत जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आशिये ठाकरवाडी येथे १०वी,१२ वी उत्तीर्ण तसेच नोकरीमध्ये पदोन्नती प्राप्त केलेल्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.यावेळी तालुका अध्यक्ष वैभव ठाकूर, सचिव- निलेश गवाणकर, जिल्हा कार्याध्यक्ष- निलेश ठाकूर, नामदेव ठाकूर,उमेश ठाकूर, विलास ठाकूर,प्रविण ठाकूर, विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, ग्रामसेवक राकेश गोवळकर,अभिमन्यू ठाकूर, अनिल ठाकूर, सचिन ठाकूर, अर्पिता ठाकूर, सुरज गवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी १० वी, १२ वी उ्तीर्ण, इतर प्राविण्य मिळालेल्या मुलांचा गौरव करण्यात आला.
प्रमोद ठाकुर विस्तार अधिकारी कृषि, सौ. अर्पिता ठाकुर मंडळ अधिकारी ( महसुल ) पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला . अभिमन्यु ठाकुर यांचा सेवा निवृत्ती पर सत्कार करण्यात आला.

तालुकाध्यक्ष वैभव ठाकूर म्हणाले,कठोर परिश्रमपूर्वक शिक्षण प्राप्त केल्याशिवाय आपली व समाजाची प्रगती होणार नाही,असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश ठाकूर यांनी तर निलेश गवाणकर आभार मानले.

error: Content is protected !!