गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्ती करा अन्यथा उपोषणाचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील कनेडी नरडवे रोडवरील नाटळ फाटा ते रामेश्वर मंदिर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून निवेदने देऊनही रस्ता मजबुतीकरण आणि नूतनीकरण कडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणाचा निषेध म्हणून या रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध शिवसेना उबाठा च्या वतीने करण्यात आला.अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.या मार्गावरील एस.टी सेवा देखिल ठप्प आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची वाहतूक व्यवस्थेअभावी परवड होत आहे. बांधकाम विभाग आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्यांमधे वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनावेळी प्रदिप सावंत, शाखाप्रमुख सचिन सावंत,अभिषण सावंत, गजानन पाटकर,युवासेना शाखाप्रमुख लक्ष्मीकांत लाड सचिन खांदारे महिला विभाग प्रमुख अनिषा सावंत, गणेश सावंत,जितेंद्र सावंत, बापू पांगम, रमेश नाटळकर, अनिल सावंत,नागेश बोडेकर,शंकर पाटकर नलेश परब, विकास सावंत,निलेश सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या गणपती सणाच्या पूर्वी ठोस उपाययोजना न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.












