परब मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक परब यांचे दातृत्व
श्री जयंती देवी मंदिर परिसरात धूप, रुद्राक्ष, चंदन झाडांचे वृक्षारोपण
आचरा (प्रतिनिधी): जेष्ठ नागरीक सेवा संघ पळसंब यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष दादा पुजारे यांच्या अध्यक्षतेखाली श्री जयंती देवी मंदिर पळसंब येथे पार पडली. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून परब मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक परब ( गजानन मेडिकल आचरा) उपस्थित होते. त्यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले व जेष्ठ नागरिक संघासाठी रोख ५००० रुपयाची मदतही दिली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मार्गदर्शन केले सरपंच महेश वरक यांनी स्वर्गीय भाई चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा दिला तर उपसरपंच अविराज परब यांनी जेष्ठांकडे उज्ज्वल भावी पिढी घडविण्यासाठी त्यांच्याठाई असलेल्या अनुभवाची शिदोरी आमच्या पदरी द्यावी अशी विनम्र मागणी केली. सुरेंद्र(अन्ना) सकपाळ ( सेवानिवृत्त पोलिस अधिकारी) यांनी मार्गदर्शन करत असताना नैराश्य, चिंता, प्रकृती आणि स्वास्थ्य ,असमाधान या चार सुत्रीचा योग्य उपयोग जर आपण करू शकलो तर या वयात सुध्दा समाधानी जीवन कसे जगू शकतो याचे सखोल मार्गदर्शन केले या शुभ प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा पुजारे उपाध्यक्ष रतिका विजय गोलतकर, सचिव विश्वनाथ गोलतकर, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, सुभाष तर्फे, तुळशीदास चव्हाण, गणेश पुजारे, ज्ञानदेव परब, दिवाकर पुजारे, मारुती परब, मधुकर सावंत,विजय सावंत, पुंडलिक परब, महादेव वाघ, सुरेश पुजारे, मधुकर कदम, शारदा पुजारे, जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश परब यांनी केले आणि सुत्रसंचालन प्रमोद सावंत यांनी केले.












