खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण ग्रामपंचायत तर्फे करण्यात आला सन्मान
खारेपाटण (प्रतिनिधी): 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ कॉलेजच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजधुरीणांचा दरवर्षी याठिकाणी कौतुक सोहळा होत असतो. वायंगणी गावचे सुपुत्र प्रशांत लाड हे कायमच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून वायंगणी गावचा व खारेपाटण गावाच्या विकासकामांना शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याचं प्रयत्न ते मंत्रालय पातळीवर करीत असतात. तसेच खारेपाटण तालुका कृती समिती मध्ये देखील एक अढळ स्थान निर्माण केले असून खारेपाटण वायंगणी सह भागाच्या विकासाच्या दृष्टीने ते काम करीत आहेत आणि त्याचीच दाखल घेऊन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या विद्यमानाने त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यानंतर प्रशालेच्या विविध कक्षांचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा देखील याठिकाणी पार पडला . प्रशांत लाड यांच्या हस्ते संगीत कक्षांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर,संस्था पदाधिकारी गोट्या कोळसुलकर, विजय देसाई, सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत, माजी सरपंच रमाकांत राऊत, भाऊ राणे,संकेत शेट्ये, गौरी शिंदे,नंदू कोरगावकर,आदी मान्यवर उपस्थित होते.










