कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणेंच्या शिफारशीमुळे कणकवली विधानसभा मतदारसंघा च्या सर्वांगीण विकासासाठी 2515 योजनेंतर्गत 5 कोटी रुपयांचा विकासनिधी राज्य शासनाने जाहीर केला आहे. आ.नितेश राणे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी 14 ऑगस्ट रोजी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.निधी मंजुरीचे आदेश कार्यसिन अधिकारी अभिजित तेलवेकर यांनी काढले आहेत.शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या निधीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळणार आहे. आ.नितेश राणेंनी भरीव विकासनिधी मंजूर करून आणल्याबद्दल कणकवली विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
आम. नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे 2515 योजनेंतर्गत 5 कोटींचा निधी मंजूर












