कणकवली (प्रतिनिधी): येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त शहीद जवानांच्या परिवारांचा तसेच प्रगतिशील शेतकऱ्याचा येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते शाल ,सन्मानचिन्ह, महाविद्यालयाचा वार्षिक अंक आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी भारत – पाकिस्तान युद्धामध्ये (१९७१) शहीद झालेले जिल्ह्याचे सुपुत्र शहीद जवान अनंत चाळके यांच्या पत्नी श्रीमती सुमित्रा अनंत चाळके तसेच शहीद जवान सदाशिव बाईत यांच्या पत्नी सुलोचना सदाशिव बाईत यांच्या परिवारांचा तसेच प्रगतीशील शेतकरी सिद्धी वारंग, (सावडाव ) आणि नेव्ही मध्ये निवड झालेल्या कु. अमृता परब या विद्यार्थिनीच्या कुठुंबियाचाही महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, डॉ. संदीप साळुंखे ,प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक अरुण चव्हाण एनसीसी लेफ्ट .डॉ. बी. एल. राठोड, प्रा.डॉ.सोमनाथ कदम, प्रा. डॉ.बाळकृष्ण गावडे, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा . सुरेश पाटील,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी, एन, एस. एस, आजीवन अध्ययन व विस्तार शिक्षण विभाग आणि सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कणकवली महाविद्यालयात शहीद जवानांच्या परिवाराचा सत्कार












