सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखा नविन एटीएम चे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरूवार दि.17ऑगस्ट रोजी सायं. 5 वा. करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी,माजी आमदार तथा बँकेचे माजी संचालक अजित गोगटे , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँक संचालक प्रकाश बोडस,आदि मान्यावर उपस्थित रहाणार आहेत सदर सोहळ्यास गावातील ग्रामस्थ, ग्राहक,ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असा आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.
जिल्हा बँक तळेबाजार शाखा एटिएम चे नितेश राणे यांच्या हस्ते 17 ऑगस्ट रोजी उद्घाटन












