माड्याचीवाडी ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा

कुडाळ (अमोल गोसावी) : माड्याचीवाडी ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी दिमाखात साजरा केला.गावातील माजी स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी,ज्येष्ठ ग्रामस्थ,शिक्षक,विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,मदतनीस पोस्टमास्तर,कलाकार,दिव्यांग यांचा यथोचित गौरव गावचे भूषण श्री श्री १०८ महंत गावडेकाका महाराज,जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे,सरपंच सचिन गावडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांना कल्पवृक्ष,शाल,श्रीफळ प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.अमृत महोत्सवानिमित्त ७५ जणांना कल्पवृक्ष वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस पाटील संजय नाईक,नेरूर माजी सरपंच प्रसाद पोईपकर,माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक रावण, सेवानिवृत्त पोलिस विष्णू खोबरेकर,उपसरपंच योगेश्वरी कोरगांवकर,सदस्य विघ्नेश गावडे,सुदर्शन घोगडे, अस्मिता गावडे, कांचन डिचोलकर,रुपेश गावडे,काशीबाई कोरगांवकर,रतन तर्पे,प्रणील कोरगांवकर,ग्रामसेवक मनोहर शेडगे,दाजी गोलम,राजेश जाधव,राजेद्र गावडे,विनया गावडे,अभय गावडे,रामकृष्ण गडकरी,संतोष परब,सायली धामापूरकर,श्रावणी परब,सुषमा गायकवाड,श्वेता दळवी,अलका मुंडये,शंकर पेडणेकर, संदेश प्रभू,तुळसकर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!