” त्या ” वेटिंग लिस्टवरील सर्व प्रवाशांनानवीन सुरू होणाऱ्या ट्रेनमध्ये बुकिंग द्या

मनसे सरचिटणीस उपरकर यांची सेंटर रेल्वे च्या जि एम कडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी): कोकणात गणपती साठी येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग चार महिने अगोदर करून देखील 800 ते 850 वेटिंग लिस्ट वर असलेल्या प्रवाशांना सुरू होणाऱ्या नवीन गाड्यांमध्ये सर्व वेटिंग लिस्ट वर असलेल्या प्रवाशांना वर्ग करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम जीजी उपरकर यांनी जनरल मॅनेजर, सेंटर रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांना पत्र लिहिले या विषयी बोलताना उपरकर म्हणाले कोकण रेल्वेतून येणारे गणेश भक्त रेल्वेचे तिकीट चार महिने आगाऊ बुक करत आहेत मागील काळात बुकिंग एजंटांच्या घोळा बाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या घोळामध्ये कोकण रेल्वेच्या गाड्या ऑनलाइन साईड ओपन झाल्यावर पाच ते दहा सेकंदात गाड्या फुल होतात व 800 ते 850 प्रवासी बुकिंग वेटिंग लिस्ट वर राहते. याबाबत माहितीनुसार कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना तिकिटे मिळत नाहीत व वेटिंगवरील असलेली तिकिटे कन्फर्म होईल या आशेवर प्रवासी असतात परंतु वास्तविक पाहता रेल्वेची क्षमता 800 ते 1200 असताना वेटिंग लिस्ट किती संख्येवर ठेवणे हे रेल्वेने आखले पाहिजे तसेच वेटिंग लिस्ट कोठा कमी ठेवून रेल्वेचे बुकिंग बंद करण्याची गरज असताना देखील 800 ते 850 वेटिंग लिस्ट ठेवून त्या असलेल्या प्रवाशांचे चार महिने बुकिंग केलेले वेटिंग वर राहणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतीचे व्याज कोकण रेल्वे मिळवत आहे. असेही म्हणाले मात्र कोकणात गणपतीसाठी येणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकिंग अशाच प्रकारे झालेले असल्याने सर्व वेटिंग लिस्ट प्रवाशांना ज्यादा गाड्यांमध्ये अग्रक्रमाने सीट देण्यात यावी किंवा वेटिंग लिस्ट वर असलेल्या प्रवाशांना नवीन घोषणा होणाऱ्या गाड्यामध्ये वर्ग करावेत जेणेकरून सर्व गणेश भक्तांना कोकणात सुखरूप येता येईल प्रत्येक वेळी नव्याने गाडीचे तिकीट बुक करताना पाच सेकंदात पूर्वी गाड्या फुल दाखवल्या जातात आणि त्याचा फायदा एजंट लोक घेऊन खिडकीवर उभे राहणाऱ्या प्रवाशांना मात्र वेटिंग लिस्टला राहावे लागते हा प्रकार वारंवार घडत असून वेटिंग लिस्ट प्रवाशांच्या तिकिटाच्या पैशाचं व्याज रेल्वेला मिळत आहे त्यामुळे वेटिंग लिस्ट चा कोटा कमी करून रेल्वेने बुकिंग रिग्रेट दाखवण्यात यावं अन्यथा वेटिंग लिस्ट वर असलेल्या सर्व प्रवाशांना घोषित होणाऱ्या गाड्यांमध्ये वर्ग करावे वेटिंग लिस्ट चा घोळ संपवा आणि तिकीट बुकिंग मध्ये होणारा काळाबाजार बंद करा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे परशुराम प्रभाकर उपरकर माजी आमदार मनसे राज्य सरचिटणीस यांनी मागणी केली आहे.

error: Content is protected !!