आ.नितेश राणेंकडून वायंगणी ग्रा.पं. कार्यालय विस्तारीकरणासाठी यांनी 2515 योजने अंतर्गत 7.50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर

वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी आमदार नितेश राणे यांचे मानले आभार.

वायंगणी गावाला मिळणार सुसज्ज नवीन ग्रा पं इमारत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा क्षेत्रात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५ १२३८) योजनेंतर्गत विकासकामांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडील शासन निर्णय दि. १४ ऑगस्ट २०२३ अन्वये 5 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मौजे वायंगणी हि ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्यावर आमदार नितेश राणे यांच्याकडे अस्मि प्रशांत लाड यांनी वायंगणी साठी सुसज्ज ग्रामपंचायत इमारत व्हावी यासाठी मागणी केली होती.सदरची मागणी आमदार नितेशजी राणे यांनी मान्य करत वायंगणी ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण या विकास कामासाठी शासनाने 7.50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नामुळे सदरच्या विकास कामासाठी 7.50 लक्ष रुपयांच्या निधीस राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण व नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नवीन ग्रामपंचायत कार्यालय उभारणी साठी 12 लक्ष निधी जनसुविधा अंतर्गत मंजूर केला होता. त्यामुळे आता एकूण 19.50 लाख एवढा भरघोस निधी या ग्रामपंचायत कार्यालय उभारणी साठी व विस्तारणीकरण यासाठी दिल्या बद्दल आमदार नितेश राणे यांचे ग्रामपंचायत वायंगणी व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अस्मि लाड यांनी जाहीर आभार मानले आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांना सुसज्ज असे ग्रामसचिवालय मिळणार असून लवकरच या कामाला सुरवात होणार आहे.

error: Content is protected !!