गळफास लावून घेत तरुणाची आत्महत्या

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ओरोस देऊळवाडी येथील निलेश रामदास आंगणे (वय २७) याने या तरुणाने आज राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी निलेश आपल्या घरातील आई वडिलांच्या खोलीमध्ये झोपायला गेला होता. थोड्यावेळाने पाहिले असता त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्याचे उपचार सुरू असताना निधन झाले. त्याने आत्महत्या कोणत्या कारणाने केली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिंधुदुर्गनगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!