सामाजिक कार्यकर्ते उद्योजक रुपेश सावंत यांच्याकडून खारेपाटण हायस्कूलला ५०,००० रुपयांची मदत

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील युवा उद्योजक व खारेपाटण गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांनी खारेपाटण हायस्कूलच्या गरीब व गरजू विद्यार्थ्याना शैशणिक साहित्य खरेदीसाठी सुमारे ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली असून खारेपाटण हायस्कूलच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

भरतोय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मा.आमदार रविद्र फाटक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांच्या प्रयत्नाने खारेपाटण हायस्कूल येथे सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांनी सार्वजनिक ध्वजरोहन कार्यक्रमास उपस्थित राहून ही देणगी जाहीर केली.

इयत्ता ११ वी च्या एकूण २५ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना कॉलेज फी तसेच शालेय गणवेश,वह्या पुस्तके याकरिता प्रत्येकी २००० /- रुपये तर खारेपाटण – तळेरे विभागतील तसेच केळवली,राजापूर विभगातील व कोर्ले – धालवली विभागातील गरजू विद्यार्थ्यांना ही मदत जाहीर केली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश सावंत यांनी यापूर्वी देखील खारेपाटण हायस्कूल ला एका वर्ग खोलीचे नूतनीकरण करण्यासाठी २ लाख रुपयाची देणगी शाळेला दिली होती.या वर्ग खोलीचे उद्घाटन देखील रुपेश सावंत यांच्या शुभभस्ते यावेळी पार पडले.

तसेच भरतोय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रुपेश सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप केले. आपल्या दातृत्वातून गरजवंताला मदत करणारे खारेपाटण गावचे सुपुत्र व युवा उद्योजक आणि सामजिक कार्यकर्ते रुपेश सावंत याचा खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तर शाळेच्या वतीने रुपेश सावंत यांचे शाळेला मदत केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!