महिला रक्तदान शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कुडाळ ( अमोल गोसावी ) : वारंगाची तुळसुली येथील एकता ग्रामसंघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिला रक्तदान शिबिरात जवळपास 114 महिलांनी सहभाग नोंदवून रक्तदान शिबीर यशस्वी केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन लिंगेश्वर विद्यालयाच्या हॉल मध्ये तुळसुली गावचे सरपंच मिलिंद नाईक, उमेद अभियानाचे राठोड सर, सौ. सुप्रिया वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक भाटिवडेकर सर, ए. पी. वारंग सर, उपसरपंच श्री. जयराम वारंग व ग्रा. प. सदस्य, आरोग्य सेवक, ग्रामसंघाच्या सौ. प्रविणा वारंग, सौ. विणा वारंग, सौ. तन्वी तुळसुलकर , प्राची मेस्त्री,तेजस्वी मेस्त्री कविता वारंग आणि बचत गटातील सर्व महिला व मोलाचे सहकार्य करणारे ग्रामस्थ यांच्या उपस्थित झाले. या कार्यक्रमांस सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान व पडवे हॉस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!