ऍड.अनिल निरवडेकर यांचा यशस्वी युक्तिवाद
सावंतवाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ओटवणे येथील विलास वासुदेव जाधव (रा. नवीन जाधववाडी) याला जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या कामी अॅड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले. या प्रकरणातील फिर्यादी मुलगी दुचाकीवरून जात असताना जाधव याने तिच्यावर अत्याचार केला होता. तशी तक्रार तिने दिली होती. त्यानंतर १२ तारखेला जाधव याला अटक करण्यात आली होती.












