कत्तलखान्यात नेणारी 18 गुरे फोंडाघाट मध्ये पकडली

6 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी): 3 बलेरो पिकअप मधून निपाणीच्या दिशेने कत्तलखान्यात नेत असलेली 18 गुरे फोंडाघाट चेकपोस्ट वर पोलिसांनी पकडली. आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.फोंडाघाट चेकपोस्ट वर ड्युटी बजावत असलेले पोलीस नाईक दिगंबर घाडीगांवकर यांनी हे टेम्पोसह 6 आरोपींना पकडून कणकवली पोलीस ठाण्यात आणले. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

error: Content is protected !!