कुडाळ ( अमोल गोसावी ) : शिवाजी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठाच्या प्राचार्य पदी प्रा. संजय मालवणकर सर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त पणदूर तिठा शाळेचे माजी विद्यार्थी दिवाकर बांबर्डेकर, गुरुनाथ गडकर, आनंद चव्हाण, सुधीर कदम, प्रसाद सावंत यांनी नवनियुक्त प्राचार्य संजय मालवणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच संजय मालवणकर सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राध्यापिका प्रतिभा कुबल मॅडम उपस्थित होत्या. प्राचार्य संजय मालवणकर सर यांनी आजवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थी वर्गाशी मैत्री आणि आपुलकीचे नाते जपले आहे. त्याचमुळे शाळेचा मोठ्या प्रमाणात आजी – माजी विद्यार्थी वर्ग मालवणकर सरांचा चाहता आहे.













