ओसरगाव पोस्ट कडील मिडलकट खुला करा – बबली राणे

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव पोस्ट येथे मुंबई गोवा महामार्गावर पाच वर्ष चालू असलेला मिडलकट अचानक बंद केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत माजी उपसरपंच बबली राणे यांनी पाहणी करून लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्याची विनंती केली आहे महत्त्वाचा एसटी स्टॉप असल्यामुळे ग्रामपंचायत ओसरगाव उपकेंद्र पोस्ट ऑफिस तलाठी ऑफिस मेडिकल बँक महिला भवन व संध्याकाळी व सकाळी येणारी कळसुली गाडी दोन किलोमीटर टोलनाक्याकडे वळण घ्यावे लागते होणारी ग्रामस्थांची गैरसोय दूर न केल्यास सर्वांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल काही दिवसावर गणेशोत्सव येत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची व ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय झाली आहे त्यामुळे तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर मिडल कट चालू करावा त्यामुळे मिडल कट बंद केल्यामुळे बोर्डवे फाट्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे महिला भवनला सततच्या बैठका असतात जिल्हाभरातले लोक त्या बैठकीसाठी येत असतात त्या सर्वांना दोन किलोमीटर टोलनाक्याकडनं वळण घ्यावे लागते हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.

error: Content is protected !!