राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हाधिकारी तावडे यांची भेट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावड़े यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शाल व पुष्पगुष देऊन शुभेच्छा दिल्या. नूतन जिल्हाधिकारी श्री किशोर तावड़े यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी जिल्ह्याधिकारी तावड़े यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची कामे मार्गी लावणार ,विकासकामे मार्गी लावणार असे आश्वासित केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रांतिक सदयस्य सावळाराम अणावकर , माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीक खान, अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष सरफराज नाईक,राष्ट्रवादी व्ही जे एन टी सेल जिल्हाअध्यक्ष अशोक पवार,आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!