शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटणच्या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी): टेनिस क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने दी. १७ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ रोजी फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल,जाधववाडी रोड, धाराशिव येथे ५ वी सतरा वर्षातील राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संघाने सहभाग घेतला होता. त्यामधून करण किशोर दळवी (उंबर्डे), सोहम संजय कदम (वारगांव) राज मनोहर कांबळे (कोर्ले) या खारेपाटण जुनियर कॉलेजमधील तीन मुलांची निवड नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सचिव कुणाल हळदणकर सर आणि संघ व्यवस्थापक राहुल धुरी सर यांनी दिली. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे व ७सचिव श्री महेश कोळसुलकर तसेच सर्व संचालक मंडळ सदस्यांनी या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. शेठ न. म.विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण या विद्यालयात हे विद्यार्थी शिकत असून या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. संजय सानप सर, क्रीडा शिक्षक श्री. पाडवी सर, महाराष्ट्र राज्य समाज गौरव पुरस्कार प्राप्त जेष्ठ समाजसेवक सुनील सदानंद नारकर सर यांनी मुलांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पाचव्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी टेनिस क्रिकेट असोशियन भारतीय सचिव आणि महाराष्ट्र सचिव सौ. मीनाक्षी विलास गिरी, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे सर, महेश मिश्रा सर, संदीप पाटील सर, सिद्धेश गुरव सर हे या निवडी दरम्यान उपस्थित होते. खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या या तिन्ही विद्यार्थ्यांचे खारेपाटण दशक्रोशित अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!