मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे देऊळवाडी (आईरवाडी) येथील सौ. नलिनी शांताराम आईर (५८) यांचे मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले. पश्चात पती, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, जावई, सून, नातवंडे, दीर, भावजय, पुतणे असा परिवार आहे. भगवती मंदिर नजीकचे हॉटेल ‘भगवती’चे मालक शांताराम बाळा आईर यांच्या त्या पत्नी, तर इमारत पेन्टिंग कारागीर रणजीत आईर यांच्या त्या मातोश्री होत.













