कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठ ढालकाठी परिसरातील श्रीमती शालिनी धोंडू काणेकर (89) यांचे शनिवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नर्सिगचे प्रशिक्षण घेवून जि.प.मध्ये 35 वर्षे परिचारीका म्हणून सेवा केली होती. त्या कणकवलीत शाली आत्या उर्फ आक्का म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पश्चात भाचे, सुना, बहिणी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. साहित्यिक महेश काणेकर यांच्या त्या आत्या होत.
कणकवली बाजार पेठेतील शालिनी काणेकर यांचे निधन










