6720 रुपयांची दारू जप्त
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यात पीआय अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कलमठ आणि नडगिवे येथे अवैध दारू विक्रीवर कणकवली पोलिसांनी छापे मारून 6 हजार 720 रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. याबाबत दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला पोलीस हवालदार नीलम उत्तम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलमठ कोष्टी आळी येथे अर्चना एकनाथ खामकर या महिलेच्या ताब्यातून 5 हजार 760 रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली.पीएसआय बापू खरात यांच्या नेतृत्वाखाली हवालदार देसाई, कॉन्स्टेबल माने, कॉन्स्टेबल राऊत यांनी शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजता ही कारवाई केली. खारेपाटण ओपी चे पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नडगिवे बांबरवाडी येथे मेघेश दिलीप पाटील याच्या ताब्यातून 960 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. खारेपाटण ओपी चे पोलीस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल पराग मोहिते यांनी ही कारवाई केली.










