एसटीचे सेवानिवृत्त वाहक डी.जी. पवार यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कोळोशी-मधलीवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले व सध्या जानवली-शिक्षक कॉलनी येथे राहत असलेल्या दशरथ गंगाराम उर्फ डी.जी. पवार (68) यांचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. डी.जी. पवार हे एसटी महामंडळामधून वाहक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यावर कोळोशी येथील स्मशानभूमीत रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

error: Content is protected !!