स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केंद्रीय समितीची बापर्डे गावाला भेट

देवगड (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत केंद्रस्तरीय समितिने बापर्डे ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले आणि विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची पाहणी केली.

यावेळी या समितीचे स्वागत बापर्डे गावचे सरपंच संजय लाड यांनी केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना सरपंच संजय लाड म्हणाले कि स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये राज्यस्तराप्रमाणे केंद्रातही बापर्डे गाव अव्वल असेल अशी आशा व्यक्त केली.यावेळी या केंद्रस्तरीय समितीतील यादव व टिमने बापर्डे व जुवेश्वर गावांतील शाळा,अंगणवाडी,उपकेंद्र,मंदीरे,वैयक्तिक कुंटुबांना भेट देत स्वच्छते विषयक उपक्रमांची बारकाईने माहिती घेऊन ऑनलाईन प्रमाणे प्रश्नांची उत्तरे संबधित विभागाच्या साइटला पाठविण्यात आले.यावेळी समितीने बापर्डे गावातील नाविन्यपुर्ण उपक्रमांची कौतुक केले.

या मुल्यमापनावेळी बापर्डे गावाचे सरपंच संजय लाड,उपसरपंच विवेक वेद्रुक, माहिती व शिक्षण संवाद तज्ञ प्रविण कानकेकर,ग्रामसेवक सुशिल जाधव ,माजी जि.प सदस्या अनघा राणे,ग्रा.प सदस्य संतोष नाईकधुरे,गुणवंत राणे,रुपेश मोंडकर,स्वाती नाईकधुरे,दिशा वासगे,पोलिस पाटील नितीन नाईकधुरे,तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष नाईकधुरे,संदिप नाईकधुरे,जीवन नाईकधुरे,फोटोग्राफर प्रज्वल गायकवाड आणि कर्मचारिवृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!