वरेरी येथील घराचे सिमेंट पत्रे व अँगल चोरीप्रकरणी पतिपत्नी सह अन्य एकावर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : वरेरी येथील किशोर विठ्ठल तिर्लोटकर यांच्या घराचे २१ सिमेंट पत्रे व अँगल असा सुमारे २५ हजार रूपये qकमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तेथिलच अजय डोंगरेकर, अविषा डोंगरेकर ही पती पत्नी व संकेत घाडी अशा तिघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.चोरीची घटना १७ जुलै रोजी दुपारी ३ वा.सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वरेरी येथील किशोर विठ्ठल तिर्लोटकर हे पुणे येथे राहत असून त्यांच्या वरेरी येथील घराची देखभाल त्यांचे माऊसभाऊ दिपक हरी पुजारे हे पाहत होते.दि. १७ जुलै रोजी दुपारी ३ वा.सुमारास तिर्लोटकर यांच्या घराचे २१ पत्रे एकूण रक्कम १२,२८५ व पत्र्याचे अँगल रक्कम १२,९५० असा एकूण २५,२२५ रूपये qकमतीचा मुद्देमाल वरेरी येथील अजय रघुनाथ डोंगरेकर, सौ.अविषा अजय डोंगरेकर व संकेत संतोष घाडी या तिघांनी संगनमत करून चोरून नेल्याची तक्रार घराची देखभाल करणारे दिपक पुजारे यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पो.हे.कॉ.उदय शिरगांवकर करीत आहेत.

error: Content is protected !!