सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये पुरस्कृत

खारेपाटण येथे लहान मुले व महिलासाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत प्रकाश शेट्ये यांच्या वतीने दि.३० /०८/२०२३ रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आगळी वेगळी अशी लहान मुलासाठी व महिलांसाठी नारळ लढविणे आर्थात नारळ फोडण्याची स्पर्धा खारेपाटण येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती श्री संकेत शेट्ये यांनी दिली.

   आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक सन त्योहार हे सद्या लोप पावत चालले असून त्याचे पवित्र आणि महत्व कमी होताना दिसत आहे. विशेष करून युवक व लहान मुलांमध्ये  पारंपरिक सन व त्या अनुषगाने असणाऱ्या परंपरा व रीतिरिवाज तसेच आपल्या सणांचे  महत्व टिकून रहावे आणि मुलांना त्याचा आनंद लुटता यावा.म्हणून आपण संकेत शेट्ये मित्र मंडळच्या वतीने खारेपाटण मध्ये प्रथम लहान मुलासाठी व विशेष करून महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा भरवित असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये यांनी यावेळी सांगितले. 

खारेपाटण एस टी बस स्थानक येथे दि.३०/८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता नारळी पौर्णिमेच्या दिवशी घेण्यात आलेल्या या नारळ लढविणे स्पर्धेकरीता लागणारे सुमारे १००० पेक्षा अधिक नारळ श्री संकेत शेट्ये यांनी दिले आहेत. तसेच ही नारळ फोडणे स्पर्धा सर्व मुलासाठी व महिलांसाठी मोफत ठेवण्यात आलेली असून या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकाने स्वतः फोडलेले सर्व नारळ त्या स्पर्धकालाच देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १५००/- रुपये १०००/- रुपये व ५५५/- रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मुलांनी व महिलांनी या नारळ लढविणे स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन श्री संकेत शेट्ये यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!