चौके (अमोल गोसावी) : अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान संस्था आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान मेळावा भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या ठिकाणी उत्साहात पार पडला. या मेळाव्यात टोपीवाला हायस्कुल चा विद्यार्थी कु. वेदांत शिवप्रसाद नाईक याने प्रथम तर भंडारी हायस्कुलची विद्यार्थिनी कुमारी दिया दत्तात्रय गोळतकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर देवबाग हायस्कुल चा विद्यार्थी कुमार दत्तप्रसाद तेंडोलकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रथम व द्वितीय क्रमांकाची जिल्हा स्तरासाठी निवड करण्यात आली.
यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष असल्याने मेळाव्या साठी “भरड धान्य -पौष्टिक आहार कि भ्रम ” हा विषय देण्यात आला होता. मालवण तालुक्यातून एकूण 16 शाळांनी या मध्ये सहभाग घेऊन प्रस्तुत विषयावर उत्तम सादरीकरण केले.उदघाटन समारंभासाठी मालवण पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी संजय माने, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, केंद्रप्रमुख नंदकुमार गोसावी, स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका सौ रसिका गोसावी, पालक समिती उपाध्यक्ष मोहन गावडे उपस्थित होते.स्पर्धेचे परीक्षण मालवण तंत्रनिकेतन चे विभाग प्रमुख सचिन राजाध्यक्षआणि विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विजय गावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शिक्षक प्रसाद परुळेकर यांनी केले.